घरव्हिडिओका उचलले डॉ शीतल आमटे यांनी टोकाचे पाऊल ?

का उचलले डॉ शीतल आमटे यांनी टोकाचे पाऊल ?

Related Story

- Advertisement -

जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ शीतल आमटे यांनी मानसिक ताणामधून अखेर आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आमटे कुटुंबातील वाद कुठे शमतो असे वाटत असतानाच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचल्याचे कळते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आमटे कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांवर आरोप केले होते. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच हा व्हिडिओ डिलिट केला होता. आमटे कुटुबीयांनीही एक निवेदन मांडत आपली या संपुर्ण प्रकरणातील भूमिका स्पष्ट केली होती. मात्र हे सगळ प्रकरण ताज असतानाच आजच्या त्यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

- Advertisement -