सोनालीने ऐकवली यवतमाळच्या नीलची कविता

MUMBAI

गेल्या आठवड्यात २८ मे रोजी जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिच्ये ट्विटर हँडलवर एक कविता चाहत्यांना ऐकवली आहे. यवतमाळ येथील नील तुर्के यांनी पाठवलेली ही कविता मासिक पाळीबाबत अंधश्रद्धा बाळगणाऱ्या डोळ्यात झणझणीत अंजन आहे. कवितेचे शिर्षकच त्याने मा(न)सिक पाळी, दिले आहे.