चोरलेली वाहने मुळ मालकाला परत मिळवून देणारा अवलिया

राज्यभरात चोरीला गेलेल्या कोट्यावधी रुपयांच्या वाहनांचा शोध घेत मूळ मालकांपर्यंत पोहचवण्याचा छंद राम उदावंत हे करत आहेत. वारंवार पोलीस ठाण्याच्या पायर्‍या झीजवून वाहन परत मिळेल याची आशा सोडून दिलेल्यांना उदावंतांमुळे वाहन परत मिळाल्याने मालकांच्या चेहर्‍यावर आनंद फुलत आहे. त्यांनी साडेचार हजार वाहनांचा शोध लावत पोलिसांच्या मदतीने मूळ वाहनमालकांच्या स्वाधीनसुद्धा केली आहेत. त्यांच्या हटके छंदामुळे ते पोलीस वतुर्ळात चर्चेत आहेत. ते सध्या नाशिक शहरात काम करत आहेत. त्यांच्या कामाची दखल पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी घेतली असून त्यांचा सत्कार करत कौतुकाची थाप दिली आहे.