सुनील खांबे बंदचे आवाहन करत असताना त्यांना अटक

Mumbai

वंचित बहुजन अघाडी नेते प्रकाश आंबेडकर यांनी CAA आणि NRC या कायद्याच्या विरोधात महाराष्ट्रात बंद पुकारला आहे. या बंदला अनेक संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे. रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयाचे राष्ट्रीय संघटक सुनील खांबे यांनी ठाणे येथे कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरुन बंद पाळला होता. मात्र ठाणे पोलिसांनी त्यांना तातडीने अटक केली.