लग्नासाठी तापसीला वरुण धवन नको; हवाय ‘हा’ अभिनेता

Mumbai

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि अभिनेता विक्की कौशल या दोघांनी मनमर्जियां या चित्रपटातून एकत्र काम केले आहे. हे दोघेही चांगले मित्र असून त्याचा अभिनयही तितकाच तगडा आहे. नुकतेच तापसीने विक्कीबद्दल बोलताना त्याला मॅरेज मटेरिअल असल्याचे सांगितले. यापुर्वी बाहूबली अभिनेत्री तमन्ना भाटियाने विक्कीसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावेळी तापसीला अभिनेता वरुण धवन, विक्की कौशल आणि अभिषेक बच्चन यांचे नाव घेऊन अनेक प्रश्न विचारले. तिला असे ही विचारले की ती कोणाशी लग्न करायला आवडेल आणि कोणाला मारायला आवडेल? यावर अभिषेकला मारेल आणि विक्की सोबत लग्न करायला आवडेल कारण तो मॅरेज मटेरिअल आहे, असे तापसीने उत्तर दिले.