डेब्रिज माफियांवर कारवाई करा

लॉकडाऊन आणि चक्रीवादळ हे अवैध कामासाठी योग्य वेळ ठरत आहे. कांदिवली पश्चिमेकडील चारकोप सेक्टर ८ येथील गृहनिर्माण सोसायटी जवळील मोकळ्या जागेत बांधकामाचे डेब्रिज टाकले जात आहे. त्यामुळे परिसरात डेब्रिजचा ढीग तयार होत आहे. कालपासून दरदिवशी एक ते दोन वाहने भरून डेब्रिज येथील मोकळ्या जागेत डम्पिंग केले जात आहे. तसेच परिसरातील झाड ही मरत चालली आहे, असे येथील रहिवाशांनी सांगितले. तसेच डेब्रिज माफियांवर ताबडतोब कारवाई करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.