ICU बेडजवळ कॅमेरा लावून तज्ज्ञ डॉक्टरांकडून कोरोनाबाधिताचा उपचार

राज्य सरकारने आता ६ जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेली टॅली आयसीयू रुग्ण तपासणी ही आता संपूर्ण राज्यामध्ये वापरण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. तज्ज्ञ डॉक्टर कोरोना रुग्णालयात उपचार करण्याकरता कमी असल्यामुळे टॅली आयसीयू माध्यमातून तपासणी करून रुग्णांना योग्य उपचार मिळवून देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे.