‘जजमेंट’ या चित्रपटात दिसणार तेजश्री प्रधान

Mumbai

निवृत्त सनदी अधिकारी आणि पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या “ऋण” कादंबरीवर आधारित ‘जजमेंट’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या वेळी चित्रपट कसा घडला, पडद्यामागील किस्से, गमतीजमती यांचा व्हिडीओसुद्धा लाँच करण्यात आला. तर समीर सुर्वे चित्रपट दिग्दर्शनाची धूरा सांभाळणार आहेत.