ठाकरे नावाभोवती लोकांची श्रद्धा आहे

महाराष्ट्राच्या राजकारणात पवार आणि ठाकरे हे दोन नावं ब्रँड आहेत आणि राहणार. ठाकरे ब्रँडमागे बाळासाहेबांचे पुण्य आहे, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. माय महानगरच्या खुल्लमखुल्ला मुलाखतीत ठाकरे नावामागची जादू राऊत यांनी उलगडून सांगितली.