पालिका आयुक्तांनी सांगितली एकनाथ शिंदेंसोबतचा अनुभव

कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून गेल्या ७ महिन्यांमध्ये सामान्य नागरिकांसोबतच देशभरात मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी देखील कोरोना पॉझिटीव्ह झाले होते. तीच परिस्थिती ठाणे महानगर पालिकेच्या कार्यक्षेत्रात देखील पाहायला मिळाली. ठाण्याचे पालकमंत्री आणि राज्याच्या नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यामुळे त्यांच्या कामाचा वेग किंवा आवाका कमी झाला नाही. स्वत: पीपीई किट घालून एकनाथ शिंदेंनी कोरोना वॉर्डमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे ठाण्याचे पालिका आयुक्त विपीन शर्मा आणि त्यांच्या टीमने एकनाथ शिंदेंचं कौतुक करतानाच त्यांच्यापासून प्रेरणा मिळाल्याचं सांगितलं आहे.