लिंक, लॉगिन आयडी, पासवर्ड न मिळाल्याने विद्यार्थी आक्रमक

मुंबई विद्यापीठाच्या दूर आणि मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेला सुरुवात झाली. परंतु, पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना परीक्षेची लिंक, लॉगिन आयडी व पासवर्ड मिळत नसल्याचा प्रकार मंगळवारी तिसर्‍या दिवशीही कायम राहिला. आर्ट्स आणि कॉमर्सच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा तांत्रिक कारणामुळे अचानक रद्द करण्यात आल्या. त्यामुळे गोंधळलेल्या विद्यार्थ्यांनी थेट आयडॉलकडेच धाव घेत एकच गोंधळ घातला.