हिरोपंती करणाऱ्या टायगरला हिरोइनच मिळेना!

MUMBAI

अभिनेता टायगर श्रॉफच्या बागी १ आणि बागी २ नंतर आता बागी ३ सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा फर्स्ट लूकसुद्धा रिलीज झाला आहे. परंतु या सिनेमासाठी कोणतीच अभिनेत्री टायगरसोबत काम करायला तयार नाहीये. श्रद्धा कपूर, सारा अली खान, दिशा पटनानी यांनी देखील या सिनेमासाठी नकार दिला आहे.