Tik Tok व्हिडिओ बनवताय की जीव गमावताय? 

Mumbai

हल्ली तरुण-तरुणी टिक-टॉक व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. या व्हिडिओंना हजारो लाईक्स मिळत असल्यामुळे तरुणाईला व्हिडिओ बनवण्याचे व्यसनच जडले आहे. मुंबईतल्या भोईवाडामध्ये राहणाऱ्या एका १५ वर्षांच्या मुलीने या टिक टॉक व्हिडिओसाठी आत्महत्या केली आहे. व्हिडिओ बनवू नको म्हणून मोबाईल काढून घेतल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले.