घरव्हिडिओशेतकऱ्याची आयडीया, ट्रम्पना चक्क कांदे केले गिफ्ट

शेतकऱ्याची आयडीया, ट्रम्पना चक्क कांदे केले गिफ्ट

Related Story

- Advertisement -

कांदा निर्यात खुली करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी निफाड तालुक्यातील नैताळे येथील शेतकरी संजय साठे यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप, त्यांच्या पत्नी यांना टोपी-उपरणे, साडी व एक किलो कांदे पाठवले आहेत. भारत दौर्‍यावर येणार्‍या अमेरिकेच्या अध्यक्षांना देण्यासाठी पाठवलेल्या या भेटवस्तूंच्या माध्यमातून त्यांनी कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या वेदना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. संजय साठे यांनी भेटवस्तूसोबत डोनाल्ड ट्रम्प यांनाही पत्र लिहिले आहे. त्यात भारतात फिरताना येथील शेतकर्‍यांचीही भेट घेता आली तर बघा, अशी विनंती केली आहे.

- Advertisement -