सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना गणेशोत्सव सुरू होण्याच्या २ दिवस अगोदर आणि परतीच्या प्रवासात २ दिवस टोलमधून सवलत मिळणार आहे. कोकणात जाणाऱ्या नागरिकांनी जवळच्या स्थानिक पोलीस स्थानक, आरटीओ कार्यालय आपला वाहन क्रमांक, वाहन मालकाचे नाव आणि प्रवास तारीख नमूद केल्यास तात्काळ टोल माफी स्टिकर देण्याबाबत निर्णय घेण्यात आला, याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली.