आजवर माणूस मानले नाही, नागरिकत्व कसे देणार?

आज मुंबईत किन्नर समुदायाच्यावतीने आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पिंक मोर्चा काढला होता. यावेळी मोर्चाच्या प्रमुख सलमा खान यांनी NRC कायद्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आजवर आम्हाला माणूस म्हणून वागणूक दिली नाही, जर NRC कायदा लागू झाला तर आमच्याकडे तर कागदपत्रेच नाहीत, मग आम्हाला नागरिकत्व मिळणार तरी कसे? असा प्रश्न उपस्थित करुन या कायद्याचा विरोध केला आहे.