छत्रपती शिवाजी महाराजांना कलाकृतीमधून मानवंदना

Mumbai

आज ६ जून रोजी थाटामाटात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगडावर शिवभक्तांची गर्दी राष्ट्रहिताच्या दृष्टीने घातक असेल. यंदा शिवाजी महाराज मनामनात, शिवराज्याभिषेक घराघरात साजरा करणे ही जबाबदारी शिवभक्तांची ओळख ठरेल. कलाकार चेतन राऊत ६ रंगछटा असलेल्या ४००० पुश पिनचा वापर करून अवघ्या ६ तासाच्या कालावधीत आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे २४ इंच x १८ इंच आकारमानाचे पोर्ट्रेट साकारले आहे. कलाकृती मधून मानवंदना देत छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार समाजात रुजविण्याचे प्रयत्न करीत आहे.