राज ठाकरेंनी केली उद्धव ठाकरेंची मिमिक्री

Mumbai

२०१४ मध्ये विधानसभा निवडणुकांच्या आधी उद्धव ठाकरेंनी स्वबळाची घोषणा केली होती. आमची इतकी वर्ष युतीमध्ये सडली, असे देखील म्हणाले होते. पण जागावाटपामध्ये मात्र युती १२४ वरच अडली. हे सगळं लाचारीमुळे होतंय.’ असे सांगताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची मिमिक्री केली. तसेच बाळासाहेब ठाकरे जर आज असते, तर भाजपची असं वागायची हिंमत झाली नसती. माझ्यासोबत देखील भाजपची असं वागायची हिंमत झाली नसती’, असं सूचक वक्तव्य राज ठाकरेंनी केलं.