उद्धव ठाकरेंची नारायण राणेंवर घणाघाती टीका

Mumbai

नारायण राणे हे ज्या पक्षात त्या पक्षाची वाट लावतात, असा थेट आरोप उद्धव ठाकरे यांनी कणकवली येथील सभेत केला आहे. आधी त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, मग स्वतःचा पक्ष काढला आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याबद्दल भाजपला शुभेच्छा, असा टोमणा देखील मारला. भाजपने राणे यांना पाच वर्ष काहीच देणार नाही, असे सांगावे. म्हणजे राणे लगेच भाजपवर देखील बोलतील, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.