प्रकाश आंबेडकरांची उदयनराजे भोसलेंवर जहरी टीका

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांचं नाव न घेता ‘एक राजा बिनडोक आहे’ अशी जहरी टीका केली आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी ही टीका केली आहे. मराठा आरक्षणासाठी काढण्यात येणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा जाहीर केला आहे. हे जाहीर करताना प्रकाश आंबेडकरांनी जहरी टीका केली आहे.