मुंबईकरांचा मासाहारानंतर शाकाहारही महागला

Mumbai

पावसामुळे फळभाज्या आणि पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाल्यामुळे मुंबईतील गृहीणींच्या बजेटवर मोठा परिणाम झाला आहे. एकीकडे समुद्रात घोंघावणाऱ्या वादळामुळे मासे महाग झाले आहेत. तर, दुसरीकडे भाज्यांनी शंभरी गाठली आहे. मटार, गवार, फ्लॉवर, कोथिंबीर, भोपळी मिरची या भाज्या ८० रुपये किलोने सध्या बाजारात विकल्या जात आहेत.