भाजप आमदार पराग अळवणी यांनी इमारतीमध्ये केली जंतूनाशक फवारणी

MUMBAI

विलेपार्लेतील भाजप आमदार पराग अळवणी यांनी स्वतः बॉयलिंग सूट घालून इमारतीमध्ये जंतूनाशक फवारणी केली. कोरोनाच्या संकटापासून बचाव करण्यासाठी विविध मतदारसंघातील आमदार त्यांच्या त्यांच्या विभागात जंतुनाशक फवारणी करत आहेत. पराग अळवणी यांचाही त्यामध्ये समावेश झाला आहे. फवारणीसोबतच त्यांनी रहिवाशांमध्ये जनजागृतीही केली.