व्हायरल व्हिडिओमध्ये दिल्लीतलं कोरोनाचं भीषण वास्तव!

दिल्लीमध्ये कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून इटलीपेक्षाही भयानक परिस्थिती दिल्लीत उद्भवली असल्याचं सांगणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. रुग्णालयांमधून स्मशानभूमीपर्यंत मृतदेह घेऊन जाणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेचे हे सदस्य असून त्यांनी दिल्लीतल्या कोरोना परिस्थितीवर प्रकाश टाकणारा हा व्हिडिओ तयार केला आहे.