केळवे रोड रेल्वे स्टेशनजवळ ट्रॅकवर पाणी

गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावासामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील केळवे रोड स्थानकावर पाणी साचले आहे. पावसाच्या पाण्यामुळे रेल्वे ट्रॅक दिसेनासा झाला आहे. काल रात्रीपासून मुंबईसह उपनगर व आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.