राष्ट्रवादी, बीजेडी पक्षांकडून इतरांनी शिकायला हवं

Mumbai

संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. स्थायी सभागृह असलेल्या राज्यसभेचे हे २५० वे सत्र आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिजू जनता दलाचे मोदींनी कौतुक केले. या दोन्ही पक्षांनी संसदेचे नियमांचे पालन केले आहे. सर्व पक्षांनी संसदिय कामकाजाचा आदर्श या दोन्ही पक्षांकडून घ्यावा, अशी अपेक्षा मोदी यांनी व्यक्त केली आहे.