उद्धव ठाकरेंना आलेल्या धमकीमागे खाकी की खादी?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मातोश्री आणि वर्षा या त्यांच्या निवासस्थानी धमकी देणारे फोन आल्यामुळे राज्यात आणि विशेषत: मुंबईच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर थेट मातोश्री उडवून देण्याची धमकी कुणी दिली? धमकी खरंच दाऊद गँगशी संबंधित व्यक्तीने दिली का? धमकी देण्यामागे काय कारण आहे? ही धमकी म्हणजे राजकीय महत्त्व वाढवण्याचा फार्स तर नाही ना? अशी चर्चा देखील सुरू झाली आहे. मात्र नक्की या धमकीची पार्श्वभूमी आणि त्यानंतर सुरू असलेली चौकशी, यावरून काही प्रश्न मात्र नक्कीच उपस्थित झाले आहेत. या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी माय महानगरच्या स्पेशल फेसबुक लाईव्हमध्ये सहभागी झालेले वरिष्ठ पत्रकार राजेश कोचरेकर आणि आपलं महानगर-माय महानगरचे संपादक संजय सावंत यांनी केलेल्या या चर्चेचा संक्षिप्त भाग!

 

संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी क्लिक करा – https://business.facebook.com/mymahanagar/videos/964723074048272/?v=964723074048272