रानटी गव्याला खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची शर्थ

Mumbai

शिराळा तालुक्यातील गुढे ते मानेवाडी जाणाऱ्या मार्गावर जवळजवळ दोन किलोमीटर अंतरापर्यंत जिओ कंपनीने केबल टाकण्यासाठी दोन फुट रुंद आणि पाच फुट खोल अशी चर मारली आहे. शनिवारी रात्रीच्यावेळी रानटी गवा चाऱ्याच्या तसेच पाण्याच्या शोधात आला असता, खोदलेल्या चरीचा अंदाज न आल्याने गवा चरीत पडून अडकला. गव्याला चरीतून मागे तसेच पुढे सरकता येत नसल्याने तो त्याठिकाणी अडकून पडला होता. शेताकडे जाणार्‍या शेतकर्‍यांना हा गवा पडलेला दिसला. या घटनेची माहीती प्रादेशिक वनविभागास कळताच तातडीने घटनास्थळी दाखल होत गव्याला चरीतून जेसीबी ट्रँक्टरच्या सहाय्याने  बाहेर काढले.