फलंदाजांमुळे दिल्ली राहणार आयपीएल जेतेपदापासून वंचित?

दिल्ली कॅपिटल्सला यंदा आयपीएल स्पर्धा जिंकण्यासाठी दावेदार मानले जात असून त्यांनी या मोसमात आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यांना १० पैकी ७ सामने जिंकण्यात यश आले आहे. त्यामुळे हा संघ प्ले-ऑफमध्ये प्रवेश करणार हे जवळपास निश्चित आहे. मात्र, त्यांच्यासाठी एक चिंतेचा विषय म्हणजे फलंदाजांच्या कामगिरीतील सातत्य. शिखर धवनने गेल्या दोन सामन्यांत शतके केली आहेत. मात्र, धवन वगळता इतर फलंदाजांच्या कामगिरीत सातत्य नाहीत. खासकरून सलामीवीर पृथ्वी शॉने फारच निराशा केली आहे. त्यामुळे दिल्लीला यंदा आयपीएल जिंकायचे असल्यास त्यांच्या फलंदाजांनी कामगिरीत सुधारणा करणे गरजेचे आहे.