कप्तान मलिक यांच्याविरोधात तक्रार आल्यास कारवाई

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे भाऊ नगरसवेक कप्तान मलिक यांनी काही दिवसांपूर्वी मजूरांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सरकार येताच मुजोरी सुरु झाल्याची टीका त्यानंतर सुरु झाली. यानंतर आता नवाब मलिक यांनी आपली बाजू मांडली आहे. कप्तान मलिक यांनी मारहाण करायला नको होती, त्यांची चूकच झालेली आहे. या प्रकरणात मजुरांनी तक्रार दिल्यास कप्तान मलिक यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करणार, असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.