पायाला भिंगरी लावून पिंजला कानाकोपरा

कोरोनाचा काळ आला आणि मनात धाकधुक व्हायला सुरूवात झाली. अत्यावश्यक सेवांमध्ये पोस्टाच्या विभाग पूर्णपणे पाठीशी उभा होता. तरीही मनात कोरोनाची भिती होतीच. आपल्यावरच नाही तर साऱ्या देशावर आणि जगावर ही परिस्थिती ओढावलेली आहे, हे सतत मनाला सांगत होते. साक्षी बेर्डे या महिला पोस्टमन आपलं घर सांभाळून लॉकडाउच्या काळात आपलं काम करत आहेत.