कंपनीने वाऱ्यावर सोडले, कामगारांची १५० किमी पायपीट

Mumbai

फलटनमधील कंपनीने बेळगावच्या ६० ते ६५ तरुणांना पगार देऊन कामावरुन काढून टाकले. त्यानंतर या तरुणांनी पायी चालत बेळगाव गाठण्याचा निर्णय घेतला. १५० किमी चालल्यानंतर सांगलीमध्ये महापालिकेच्या भरारी पथकाने युवकांना पकडले. युवक गेली तीन दिवस उपाशी असल्याचे कळताच कर्मचाऱ्यांनी केली खाण्याची सोय केली. कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने कंपनी अचानक बंद केली. कर्मचाऱ्यांना तातडीने काढले कामावरून काढले होते. युवकांना घरी पोहोचवण्यासाठी महापालिका प्रशासनाने हालचाली केल्या.