जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त

महिलांच्या जीवनातील अविभाज्य नैसर्गिक प्रक्रिया म्हणजे मासिक पाळी. दरवर्षी २८ मे रोजी हा जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने आपण यातील काही मूलभूत घटक आणि नेमकी स्वच्छता म्हणजे काय तसेच ती कशी ठेवायची याबाबत माहिती जाणून घेणार आहोत. वयाच्या दहाव्या – बाराव्या वर्षापासून ते पन्नाशीपर्यंत साधारण हा मासिक पाळीचा काळ असतो. गर्भधारणेसाठी महिलांच्या मासिक पाळीचे महत्त्व अधिक असते. मात्र अजूनही समाजात मासिक पाळीबाबत अनेक गैरसमज आहेत. या समज-गैरसमज तसेच मासिक पाळीमधील स्वच्छतेच्या महत्त्वासंबंधी माहिती जाणून घेऊया.