घरमहाराष्ट्रह्यांचा नेमका पक्ष कंचा ?

ह्यांचा नेमका पक्ष कंचा ?

Subscribe

कारंजा मतदार संघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची मोठी चर्चा आहे. त्याचे कारणही तसेच आहे. या राष्ट्रवादीच्या उमेदवाराने एका हातात शिवबंधन तर दुसर्‍या हातात घड्याळ बांधले आहे. वाशीम जिल्ह्यातील कारंजा मतदार संघातील राष्ट्रावादीचे उमेदवार प्रकाश डहाके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांचे मेव्हणे आहेत. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये डहाके याचे तिकीट कापत शरद पवार यांचे निकटवर्तीय सुभाष ठाकरे यांना संधी देण्यात आली. यानंतर डहाके यांनी नाराजी दाखवत हातात शिवसेनेचे शिवबंधन बांधले होते.

सेनेकडून उमेदवारी मिळण्यासाठी त्यांनी शिवबंधन बांधले. मात्र विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांना परत भाजपकडून उमेदवारी मिळाल्याने डहाके यांना निवडणूक लढवणे कठीण झाले होते. त्यामुळे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवावी हा प्रश्न डहाके यांच्या समोर होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी प्रकाश डहाके यांना उमेदवारी दिली.त्यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्या समोर माजी राज्य मंत्री सुभाष ठाकरे यांनी शिवबंधन सोडून घड्याळ बांधण्याचा आग्रह केला. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सेनेसोबत जोडल्या गेल्याने शिवबंधन हातात कायम आहे. तर मनामध्ये असलेल्या राष्ट्रवादी पक्षाची दुसर्‍या हातावर घड्याळ कायम राहणार असल्याच या वेळी डहाके यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रकाश डहाके यांच्या या वक्तव्यानंतर ते सेनेचे की राष्ट्रवादीचे अशीही चर्चा मतदार संघात रंगू लागली आहे. पाटील समाजाचे या मतदार संघात 70 हजार मराठा मतदान आहे. तर भाजपचे उमेदवार विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी हे अल्पसंख्याक असून मुळचे वाशीमचे रहिवासी आहेत. यामुळे स्थानिकांच्या मुद्यावर मतदार त्यांच्याकडे पाहत आहेत. यामुळे कारंजा विधानसभा मतदारसंघाची हा निवडणूक मोठी रंजक ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -