कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात युतीमध्ये फूट

शिवसेना बंडखोर उमेदवार धनंजय बोडारेसह २८ नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात सेना-भाजपातील वाद उफाळून आल्याचे दिसून येत आहे.

Kalyan
28 corporator including shiv sena rebel candidate dhananjay bodare resigns

कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातील शिवसेना बंडखोर उमेदवार धनंजय बोडारेसह २८ नगरसेवकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत युतीत फूट पडल्याचे दिसून येत आहे. कल्याण पूर्व मतदार संघातून भाजपकडून गणपत गायकवाड रिंगणात आहे. या मतदार संघावर सेनेने दावा केला होता. मात्र जागा वाटपात भाजपकडे गेल्याने सेना नाराज झाली आहे. त्यामुळे सेनेचे बोडारे यांनी बंडखोरी केली आहे. बंडखोरी शमविण्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आले नसल्याने गायकवाड यांनी त्यांच्याकडे अंगुलीय दर्शन केले होते.

नक्की वाचा कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १४२

सेना-भाजपातील वाद आला उफाळून  

बुधवारी केडीएमसीतील १८ नगरसेवक आणि उल्हासनगर मधील १० नगरसेवकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह जिल्हा प्रमुख, खासदारांना राजीनामे पाठवले आहेत. आमच्यामुळे पक्ष अडचणीत येऊ नये अशी नगरसेवकांची भूमिका आहे. त्यामुळे सेना भाजपतील वाद आणखीनच उफाळून आल्याचे दिसून येत आहे.