घरमुंबईनिवडणुकीच्या छंदामुळे विकावी लागली ५० एकर शेतजमीन

निवडणुकीच्या छंदामुळे विकावी लागली ५० एकर शेतजमीन

Subscribe

आतापर्यंत आपण निवडणूक लढवणारी अनेक माणसे पाहिली असतील. अनेक जणांनी निवडणुकीसाठी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवले. मात्र, काही काळानंतर तेही भावावर आल्याचे आपण पाहिले असेल. मात्र, जालना जिल्ह्यातील एका माणसाला निवडणूक लढवण्याचा छंद लागला आणि या निवडणुकीच्या छंदामुळे त्याला आपली तब्बल 50 एकर शेत जमीन विकावी लागली.

जालना तालुक्यातील बापकळ गावचे रहिवासी असलेले बाबासाहेब शिंदे यांनी तब्बल 9 लोकसभा आणि 13 विधानसभा निवडणुका लढवल्यात. मात्र, प्रत्येक निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळं एकेकाळी सगळ्यात श्रीमंत उमेदवार म्हणून ओळख असलेले शिंदे आज सर्वात गरीब उमेदवार आहेत. यात त्यांना निवडणुकीत होणार्या खर्चापायी आपली 50 एकर जमीन विकावी लागली. आणि आता जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघातून ते 14 वी विधानसभेची निवडणूक लढवत आहेत.

- Advertisement -

बाबासाहेब शिंदे हे 1984 पासून निवडणुका लढवत आहेत. अठरापगड जातींचे संघटन करून सुशिक्षित तरुणांना निवडणुकीत उभे करण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. तरी शेतकरी, सर्वसामान्य माणूस, आणि तरूण वर्ग आपल्याला मतदान करतील आणि एक दिवस तरी आपल्याला निवडून देतील असा आत्मविश्वास शिंदे यांना आहे. या निवडणुकीपायी शिंदे यांच्या कुटुंबात वादही निर्माण झाले. अनेक जणांनी शिंदे यांना समजवण्या प्रयत्न देखील केला. मात्र, निवडणुका लढवण्याचा जणू एक प्रकारचा त्यांना छंदच लागला आहे. त्यामुळे शिंदे यांनी संपूर्ण आयुष्यात कुणाचेच ऐकले नाही.

आज शिंदे यांच्याकडे राहते घरही नसल्याने ते गावातल्या हनुमानाच्या मंदिरातच राहतात. राजकारणात येण्याचे स्वप्न आज प्रत्येक जण पाहतो आहे.. मात्र तुमच्यावर कुणाचा तरी वरदहस्त हवा असतो. आणि तो नसेल तर काय होत. याचे जिवंत उदाहरण म्हणजे बाबासाहेब शिंदे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -