घरमहाराष्ट्रनगरमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; 'या' नेत्याने बांधले हाती शिवबंधन

नगरमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘या’ नेत्याने बांधले हाती शिवबंधन

Subscribe

नगरचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अभिषेक कळमकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भगवा खांद्यावर घेत हातामध्ये शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीला अजून एक मोठा धक्का बसला आहे. नगरचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अभिषेक कळमकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भगवा खांद्यावर घेत हातामध्ये शिवबंधन बांधले आहे. कळमकर यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मोठा फटका बसला आहे.

- Advertisement -

विभानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नगरमध्ये प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अभिषेक कळमकर यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशाचे शिवसेनेत स्वागत करण्यात आले आहे. कळमकर हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक आणि नगरचे माजी आमदार दादा कळमकर यांचे पुतणे आहेत. तसेच तरुण पिढीमध्ये त्यांची एक वेगळीच क्रेझ आहे. त्यामुळे याचा शिवसेनेला चांगलाच फायदा होण्याची शक्यता दिसून येत आहे.


हेही वाचा – शिवसेनेच्या आदित्यसोबत आता भाजपचाही ‘आदित्य’, २ सभा घेणार!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -