‘चंपा’ला पवार साहेबांशिवाय काही दिसत नाही; भाजप नेत्यावर अजित पवारांची टीका

Pimpri Chinchwad
Ajit Pawar slams Chandrakant Patil
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना अजित पवार चंपा म्हणाले

पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांच्या विषयी अजित पवार यांना प्रश्न विचारला असता पवारांच्या शिवाय त्या ‘चंपा’ला काही दिसत नाही, असे म्हणत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची अजित पवार यांनी खिल्ली उडवली. त्यानंतर मात्र त्यांनी चंपाचे स्पष्टीकरण दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज पिंपरी-चिंचवडमधील एका खासगी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती.

यावेळी पत्रकारांनी विविध प्रश्न अजित पवार यांना विचारले. चंद्रकांत पाटील यांनी पवार कुटुंबातील तरुण भविष्यात भाजपमध्ये येऊ शकतात, ते आले तर त्यांचे स्वागत आहे, असे पुण्यात म्हटले होते. पत्रकारांनी याबद्दल अजित पवार यांना छेडले असता ते म्हणाले की, पवारांच्या शिवाय त्या ‘चंपा’ ला काही दिसतच नाही. हा शॉर्ट फॉर्म आहे जस अ-प म्हणजे अजित पवार तस चंपा असे त्यांनी यावेळी स्पष्टीकरण दिले.

 

मात्र अजित पवार यांच्या शाब्दिक कोटीनंतर उपस्थित कार्यक्रत्यामध्ये हशा पिकला. पुढे ते म्हणाले की, ते जे काही म्हणतात त्याला काही अर्थ नाही. प्रत्येक वेळेस राजकारणातून पवार साहेब दूर जातील असे म्हणतात. शरद पवार यांनी किती चढ उतार पाहिले. ५५ आमदारांपैकी ५० आमदार निघून गेले पाच आमदार राहिले, तरीही तितक्याच तत्परतेने बाहेर पडले. आजही तुम्ही पाहता, शरद पवार हे आक्रमक भूमिकेतून सरकार बदलायला, सांगत आहेत, असे अजित पवार म्हणाले.