घरमुंबईकाँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक रद्द; अजित पवार म्हणाले, 'नो कॉमेंट्स'!

काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक रद्द; अजित पवार म्हणाले, ‘नो कॉमेंट्स’!

Subscribe

राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची बैठक संध्याकाळी साडेसात वाजता होणार होती. मात्र, ही बैठक ऐनवेळी रद्द झाल्याचं स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीटिंगच्या ठिकाणाहून बाहेर पडत बैठक रद्द झाल्याचं सांगितलं. मात्र, यावेळी अजित पवार यांचा चेहरा त्रासलेला दिसत होता. माध्यमांनी बैठक रद्द का झाली? असा प्रश्न विचारला असता ‘नो कमेंट्स’ एवढंच बोलत अजित पवार तडकाफडकी गाडीत बसून निघून गेले. शिवाय, ‘मी आता बारामतीला जात असून मला यात काहीही माहिती नाही’, असं देखील अजित पवार म्हणाले. त्यामुळे, नक्की बैठकीमध्ये काय घडलं? यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

अजित पवार तडकाफडकी बारामतीला रवाना!

शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात दुपारच्या सुमारास एक बैठक झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा संध्याकाळी सातच्या सुमारास समन्वय समितीची बैठक होणार होती. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार, सुनील तटकरे, अजित पवार, जयंत पाटील या नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती. मात्र, या चर्चेतून अजित पवार तडकाफडकी बाहेर पडले आणि थेट गाडीत बसून ‘मी बारामतीला जात आहे’, असं सांगत माध्यमांच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तर देण्याचं त्यांनी टाळलं. मात्र, जेव्हा अजित पवार बैठकीच्या ठिकाणाहून बाहेर पडले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव खूप काही सांगून जात होते. प्रचंड रागात आणि त्रासिक मनस्थितीमध्ये अजित पवार असल्याचं यावेळी दिसत होतं. मात्र, त्याचवेळी त्यांच्या बाजूला बसलेल्या जयंत पाटील यांच्या चेहऱ्यावर मात्र अतिशय शांत आणि हास्याचे भाव होते. त्यामुळे नक्की राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये झालं काय? याविषयी तर्क-वितर्क लढवण्यास सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

म्हणून अजित पवारांना राग आला? वाचा सविस्तर – काँग्रेसचं अखेर ठरलं, शिवसेनेच्या नेतृत्वाखाली पाच वर्ष काम करणार

दरम्यान, दुसरीकडे काँग्रेसच्या गोटात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून बैठक रद्द झाल्याचं काँग्रेसला कळवण्यातच आलं नसल्याचं समोर आलं आहे. काँग्रेसच्या बैठकीमध्ये सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे उपस्थित असून त्यांच्यापर्यंत बैठक रद्द झाल्याचं कळवण्यात आलं नसल्याचं सांगण्यात आलं आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेससोबत आमची बैठक होती. मात्र, त्यासाठी आधी त्यांच्याकडून निरोप येणार होता. पण त्यांचा निरोप आलेला नाही. त्यांच्या बैठकीत नक्की काय झालं हे माहीत नाही’, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या समन्वय समितीचे सदस्य आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.


वाचा सविस्तर – अजितदादांना राग का आला?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -