घरदेश-विदेशशिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर अमित शाह यांचे धक्कादायक भाष्य

शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर अमित शाह यांचे धक्कादायक भाष्य

Subscribe

शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्याचा कोणताही विषय आमच्यासमोर आलाच नव्हता. विधानसभा प्रचाराच्या दरम्यान मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीची सत्ता आल्यास देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असे सांगत होतो. जर कुणाला त्याबद्दल आक्षेप होता, तर तेव्हाच का नाही सांगितले? असे प्रत्युत्तर अमित शाह यांनी शिवसेनेला दिले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमित शाह यांनी हे धक्कादायक विधान केले आहे.

- Advertisement -

राज्यपालांनी कुठेही संविधानाचे हनन केलेले नाही, हे सांगताना अमित शाह म्हणाले की, “राष्ट्रवादीने मुदत संपण्याच्या आधीच राज्यपालांना पत्र लिहून आणखी मुदत मागितली होती, याचाच अर्थ राष्ट्रवादी देखील सरकार बनवण्यासाठी असमर्थ ठरत होती. त्यामुळेच संध्याकाळ पर्यंत थांबण्यात काहीच अर्थ नव्हता, म्हणूनच राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राज्यपालांनी केली.”

९ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपली होती. त्यानंतर राज्यपालांनी एकेक करुन पक्षाला सत्तास्थापनेसाठी बोलावले होते. सर्वांनाच पुरेसा वेळ दिला होता. त्यामुळे वेळ दिला नाही, असा आरोप कुणीही करु नये आणि आता तर सर्वांनाच वेळच वेळ आहे. त्यामुळे कुणाकडे १४५ आमदार असतील तर त्यांनी या क्षणी राज्यपालांकडे जाऊन बहुमत दाखवावे, असे आव्हान शाह यांनी दिले आहे.

- Advertisement -

 

महाराष्ट्रात सध्या जे काही चालू आहे ते फक्त जनतेची सहानुभूती गोळा करण्याचा प्रकार असल्याची टीकाही शाह यांनी केली आहे. राज्यात मध्यावधी लागावी, अशी आमचीही इच्छा नाही. जर तशी वेळ आलीच तर कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही मार्ग काढू. मात्र राज्यपालांंच्या नावाने गळे काढणाऱ्यांनी आजही सत्ता स्थापनेचा दावा करु शकतात, असेही ते म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -