घरविधानसभा २०१९विधानसभा निवडणूकीसाठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज

विधानसभा निवडणूकीसाठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज

Subscribe

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघासाठी २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. याकरता जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

ठाणे जिल्ह्यात पुरुष, महिला, तृतीयपंथी, दिव्यांग असे एकूण ६३ लाख ९२ हजार ३५७ मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार ३४ लाख ७९ हजार ५०८, महिला मतदार २९ लाख १२ हजार ३८२, तर तृतीयपंथी मतदार ४६७ मतदार आहेत. जिल्ह्यामध्ये दिव्यांग मतदार १० हजार ४८९ असून, सर्व्हिस मतदार १ हजार ५३२ आहेत. १८ विधानसभा मतदार संघात एकूण ६ हजार ६२१ मतदान केंद्रे असून मुख्य मतदान केंद्र ६ हजार ४८८ असून सहायक मतदान केंद्र १३३ आहेत. जिल्ह्यात ५९१ संवेदनशील मतदान केंद्र आहेत. २३ ‘सखी मतदान केंद्रे’ तर दिव्यांग मतदान केंद्रे ११ आहेत. तर आदर्श मतदान केंद्र ९ असतील. मतदान प्रक्रिया सुलभपणे राबविण्यासाठी जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात मतदान यंत्रे उपलब्ध आहेत. जिल्ह्यात एकूण ७ हजार ९५१ बॅलेट युनिट, नियंत्रण युनिट (कंट्रोल युनिट ७ हजार ४९५ , व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट्रेल) – ८ हजार ३६३ आहेत. या मध्ये राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे.

- Advertisement -

२९ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर सुमारे २९ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये पुरुष कर्मचारी १४ हजार ३१४ तर महिला कर्मचारी १३ हजार ५२६ आहेत. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि शांततेत, निर्भयपणे तसेच पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे. सुमारे १२ हजार पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड तसेच १८ केंद्रीय पथके तैनात करण्यात आली आहेत. मतदान केंद्रांवर कर्मचारी आणि साहित्याची ने आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. १ हजार ३२७ बसेस, २६ टेम्पो ट्रॅव्हलर, ३० ट्रक, ८१ कार, रिक्षा अशा एकूण २ हजार ९०४ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

मतदारांसाठी सोई-सुविधा

किमान अत्यावश्यक सुविधांमध्ये पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, शौचालय, दिव्यांग मित्र आदी सर्व किमान सुविधा पुरविण्यात येतील. दिव्यांग मतदारांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हिलचेअरची मागणी नोंदविणे यासाठी PwD ॲपची सुविधा देण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग तसेच वयोवृद्ध मतदारांकरिता व्हिलचेअर आणि रॅम्पची व्यवस्था दिव्यांग तसेच जेष्ठ नागरिक मतदारांकरिता वेगळ्या रांगेची व्यवस्था.अंध मतदारांच्या सोयीकरिता मतदान केंद्रांवरील सूचनाफलक आणि मतदार यादी, ब्रेल लिपीमध्ये तयार करण्यात आली आहे. मतदान यंत्रावर ब्रेल लिपी मुद्रीत केली असल्याने त्यांना कोणाच्याही मदतीखेरीज मतदान करता येणे शक्य. लहान मुलासह मतदानास येणाऱ्या महिला मतदारांच्या मुलांकरिता पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisement -

मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र आणि मतदार यादीतील त्यांची माहिती मिळविण्याची सुविधा भारत निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

PwD ॲपची सुविधा उपलब्ध

या संकेतस्थळावर स्वतःची संपूर्ण माहिती नमूद केल्यास माहितीचा शोध घेता येतो. माहिती भरताना नाव, वडील/पतीचे नाव, वय अथवा जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ या बाबींचा समावेश करावा. मतदार ओळख क्रमांक आणि राज्याचे नाव टाकल्यानंतर मतदारांची माहिती मिळविण्याची दुसरी सुविधाही या संकेतस्थळावर आहे. मतदारांच्या मदतीसाठी ‘व्होटर हेल्पलाईन – १९५०.’ या क्रमांकावर एसएमएस करून मतदारांना माहिती मिळवता येईल. मतदारांसाठी ‘व्होटर हेल्पलाईन ॲप’ ही सुरु असून दिव्यांग मतदारांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हिलचेअरची मागणी नोंदविणे यासाठी PwD ॲपची सुविधा.

मतदानासाठी आवश्यक ओळखपत्र

भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल अशावेळी पुढील अकरा प्रकारे आयोगाने ग्राह्य केलेल्या ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदारास आपला हक्क बजावता येईल.

१. पासपोर्ट (पारपत्र)
२. वाहन चालक परवाना
३. छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र)
४. छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबूक
५. पॅनकार्ड
६. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड
७. मनरेगा जॉबकार्ड
८. कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड
९. छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज
१०. खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र
११. आधारकार्ड

मतदान केंद्रात मोबाईल वापरास मनाई

मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदार, उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी, मतदान प्रतिनिधी (Polling Agents) यांना मोबाईल फोन, कॅमेरा, ईलेक्ट्रॉनिक वस्तू  आणि गॅझेट यांच्या वापर करण्यास भारत निवडणूक आयोगाने सक्त मनाई केली असल्यामुळे मतदान केंद्रावर मतदारांनी मोबाईल वापरु नये असे, आवाहन नार्वेकर यांनी केले आहे.

प्रचार बंदीबाबत

मतदान समाप्त होण्यापुर्वी ४८ तासांच्या कालावधीत प्रचार मोहिमेवर निर्बंध लावण्यात आले आहेत. सोशल मिडिया वरील प्रचारावर देखील बंदी असेल. प्रचार कालावधी समाप्त झाल्यानंतर राजकीय कार्याधिकाऱ्यांच्या मतदारसंघातील उपस्थिती बाबत निर्बंध असतात, असे नार्वेकर यांनी सांगितले. २४ आक्टोबर रोजी १८ विधानसभा मतदार संघनिहाय १८ ठिकाणी मतमोजणी होणार असून सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरवात होणार आहे.


हेही वाचा – युती आहे ना; मग जेवणाच्या थाळीचा रेट वेगवेगळा का? – राज ठाकरे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -