घरमहाराष्ट्रईव्हीएम, व्हीव्हीपॅटच्या मतांची सरमिसळ

ईव्हीएम, व्हीव्हीपॅटच्या मतांची सरमिसळ

Subscribe

ईव्हीएम, व्हीव्हीपॅटच्या मतांची केंद्रीय निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत संगणकीय प्रणालीने सरमिसळ करण्यात आली आहे.

मुंबई शहर जिल्हातील १० विधानसभा मतदारसंघात येत्या २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार मतदान प्रक्रिया निर्भय, नि:पक्ष आणि पारदर्शी वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने मुंबई शहर जिल्हातील निवडणूक कर्मचारी तसेच ईव्हीएम आणि व्हिव्हीपॅटची सरमिसळ (रॅण्डमायझेशन) बुधवारी केंद्रीय निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत संगणकीय प्रणालीने पूर्ण करण्यात आली आहे. यामुळे मुंबई शहर जिल्ह्यात होणाऱ्या मतदानाच्या दिवशी कोणत्या कर्मचाऱ्यास, कुठल्या विधानसभा मतदारासंघात काम करण्यास जावे लागेल, याची निश्चिती आता प्रशासकीय स्तरावर करण्यात आली आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभासाठी नियुक्त करण्यात आलेले केंद्रीय निवडणूक निरीक्षक तसेच संबंधित विधानसभा क्षेत्राचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमक्ष हे सरमिसळ झाले आहे. यावेळी निवडणूक निरीक्षक यांनी निवडणूकीसाठी नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी, माहिला अधिकारी, कर्मचारी यांच्या निवासाची व्यवस्था, प्रवास व्यवस्था, तसेच मतदान प्रक्रिया वेळेत सुरू करण्यासाठीची घ्यावयाची काळजी या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करत सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच उमेदवार किंवा त्याच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ई.व्ही.एम आणि व्हिव्हीपॅट मशिनचे सरमिसळ करण्यात आले आहे.

- Advertisement -

प्रत्येक मतदान केंद्रात ५ कर्मचाऱ्यांची आवश्यकता

मुंबई शहर जिल्हयामध्ये १० विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघामध्ये २ हजार ५९४ मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक मतदान केंद्रात प्रत्येकी किमान ५ कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. तसेच आवश्यकतेनुसार अतिरिक्त कर्मचाऱ्यांची कुमक तात्काळ उपलब्ध व्हावी. यासाठी आवश्यकतेपेक्षा किमान १० टक्के अधिक कर्मचारी आरक्षित म्हणून कर्तव्यावर असणे गरजेचे असते. त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रांसाठी १७ हजार कर्मचाऱ्यांचे द्वितीय सरमिसळ करण्यात आले आहे. राष्ट्रीय सुचना-विज्ञान केंद्र (एनआयसी) यांनी विकसित केलेल्या पोलिंग स्टाफ मॅनेजमेट सिस्टम या संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून ही सरमिसळीची प्रक्रिया करण्यात आली आहे. तर तृतीय स्तरीय सरमिसळ प्रक्रिया ही प्रत्यक्ष मतदानाच्या आदल्या दिवशी करण्यात येणार आहे.


हेही वाचा – भाजपची ४ बंडखोरांवर कारवाई, पक्षातून केली हकालपट्टी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -