काँटे की टक्कर आणि अस्तित्वाची झुंज

महाराष्ट्रातील ४० लक्षवेधी लढती

Mumbai

विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज सादर करणे, अर्ज मागे घेणे या प्रक्रिया संपल्या आहेत. बहुतेक सर्वच म्हणजे २८८ मतदारसंघातील चित्र आता स्पष्ट झाले आहे. बंडखोरांच्या नाकदुर्‍या काढल्यानंतर काही बंडखोरांनी माघार घेतली आहे, तर काही बंडखोर शड्डू ठोकून अजूनही निवडणूक रिंगणात उभे आहेत. महायुती विरुद्ध महाआघाडी असे चित्र आता स्पष्ट झाले आहे. काही मतदारसंघात बंडखोरांनी माघार घेतली असल्यामुळे दुरंगी लढत आहे, तर काही मतदारसंघात बंडखोरांनी युती, आघाडीच्या अधिकृत उमेदवारांसमोर आपले आव्हान कायम ठेवले आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ते २१ ऑक्टोबर रोजी होणार्‍या मतदानाकडे.

भाजप, शिवसेना, रासप, रिपाइं, शिवसंग्राम यांची महायुती तर काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बविआ, सपा, आरपीआय कवाडे, शेकाप अशी महाआघाडी आहे. काही मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, मनसे यांचे तगडे प्रतिस्पर्धी मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने मनसे ज्या मतदार संघात तगडे आव्हान उभे करील तेथे आपला उमेदवार दिलेला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस जेथे स्ट्राँग आहे तेथे मनसेने माघार घेतली आहे. एकंदरीत सत्ताधारी शिवसेना, भाजपला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी एकजूट केली आहे.

• नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर
देवेंद्र फडणवीस (भाजप) वि. आशिष देशमुख (काँग्रेस)
• परळी, बीड
पंकजा मुंडे (भाजप) वि. धनंजय मुंडे (राष्ट्रवादी)
• बीड
जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) वि. संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी)
• कर्जत जामखेड, अहमदनगर
राम शिंदे (भाजप) वि. रोहित पवार (राष्ट्रवादी)
• कराड दक्षिण
पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) वि. अतुल भोसले (भाजप)
• कणकवली, सिंधुदुर्ग
नितेश राणे (भाजप)वि. सतीश सावंत (शिवसेना)
• दिंडोशी, मुंबई
सुनील प्रभू (शिवसेना) वि. विद्या चव्हाण (राष्ट्रवादी)
• अणुशक्तीनगर, मुंबई
तुकाराम काते (शिवसेना)वि. नवाब मलिक (राष्ट्रवादी)
• वर्सोवा, मुंबई
भारती लव्हेकर (भाजप) वि. बलदेव खोसा (काँग्रेस) वि. राजुल पटेल (शिवसेना बंडखोर)
• मानखुर्द -शिवाजीनगर, मुंबई
विठ्ठल लोकरे (शिवसेना) वि. अबू आझमी (समाजवादी पक्ष)
• वांद्रे पूर्व
विश्वनाथ महाडेश्वर (शिवसेना) वि. तृप्ती सावंत (शिवसेना बंडखोर)
• माहिम, मुंबई
सदा सरवणकर (शिवसेना) वि. प्रविण नाईक (काँग्रेस) वि.संदीप देशपांडे (मनसे)
• भायखळा, मुंबई
वारिस युसूफ पठाण (एमआयएम) वि. यामिनी जाधव (शिवसेना) वि. मधुकर चव्हाण (काँग्रेस) वि. गीता गवळी (अभासे) वि. एजाज खान (अपक्ष)
• कळवा मुंब्रा,
जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी) वि. दीपाली सय्यद (शिवसेना)
• उल्हासनगर
कुमार आयलानी (भाजप) वि. ज्योती कलानी (राष्ट्रवादी)
• ठाणे शहर
संजय केळकर (भाजप) वि अविनाश जाधव (मनसे, राष्ट्रवादीचा पाठिंबा)
• नालासोपारा, पालघर
क्षितीज ठाकूर (बविआ) वि. प्रदीप शर्मा (शिवसेना)
• बारामती, पुणे
अजित पवार (राष्ट्रवादी) वि. गोपीचंद पडळकर (भाजप)
• कोथरुड, पुणे
चंद्रकांत पाटील (भाजप) वि. किशोर शिंदे (मनसे- आघाडीचा पाठिंबा)
• नांदगाव, नाशिक
सुहास खांडे (शिवसेना) वि. पंकज भुजबळ (राष्ट्रवादी)
• येवला, नाशिक
संभाजी पवार (शिवसेना) वि. छगन भुजबळ (राष्ट्रवादी)
• नाशिक पूर्व, नाशिक
राहुल ढिकले (भाजप) वि. बाळासाहेब सानप (राष्ट्रवादी) मनसेचा पाठिंबा
• मुक्ताईनगर, जळगाव
रोहिणी खडसे (भाजप) वि. चंद्रकांत पाटील (राष्ट्रवादी पुरस्कृत)
• साकोली, भंडारा
परिणय फुके (भाजप) वि. नाना पटोले (काँग्रेस)
• पुसद, यवतमाळ
निलय नाईक (भाजप) वि. इंद्रनिल मनोहर नाईक (राष्ट्रवादी)
• भोकर, नांदेड
बापूसाहेब गोर्टेकर (भाजप) वि. अशोक चव्हाण (काँग्रेस)
• सिल्लोड, औरंगाबाद
अब्दुल सत्तार (शिवसेना) वि. खैसर आझाद (काँग्रेस)
• फुलंब्री, औरंगाबाद
हरिभाऊ बागडे (भाजप) वि. कल्याण काळे (काँग्रेस)
• सोलापूर शहर, मध्य.
प्रणिती शिंदे (काँग्रेस) वि. दिलीप माने (शिवसेना) वि. नरसय्या आडाम (कम्युनिस्ट पक्ष)
• पंढरपूर, सोलापूर
सुधाकरराव परिचारक (भाजप) वि. भारत भालके (राष्ट्रवादी)
• श्रीवर्धन, रायगड
अदिती तटकरे (राष्ट्रवादी) वि. विनोद घोसाळकर (शिवसेना)
• सावंतवाडी, सिंधुदुर्ग
दीपक केसरकर (शिवसेना) वि. बबन साळगावकर (राष्ट्रवादी)
• कुडाळ, सिंधुदुर्ग
वैभव नाईक (शिवसेना) वि. चेतन मोंडकर (काँग्रेस)
• शिर्डी, अहमदनगर
राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) वि. सुरेश थोरात (काँग्रेस)
• अहमदनगर शहर
संग्राम जगताप (राष्ट्रवादी) वि. श्रीपाद छिंदम (बसप)
• सातारा
शिवेंद्रराजे भोसले (भाजप) वि. दीपक पवार (राष्ट्रवादी)
• माण, सातारा
जयकुमार गोरे (भाजप) वि. शेखर गोरे (शिवसेना)
• कागल, कोल्हापूर
हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी) वि. समरजीत घाटगे (अपक्ष बंडखोर) वि. संजय घाटगे (शिवसेना)
• कोल्हापूर दक्षिण
अमल महाडिक (भाजप) वि. ऋतुराज पाटील (काँग्रेस)
• गंगाखेड, परभणी
विशाल कदम (शिवसेना) वि. रत्नाकर गुट्टे (रासप) वि. डॉ. मधूसुदन केंद्रे (राष्ट्रवादी)