आमचं ठरलंय

Mumbai

आम्ही देशाचे सुशिक्षित मतदार…
आणि हो आमचं ठरलंय
गेले दोन महिने सर्व काही पाहिलंय
कोणी मारल्यात कोलांटउड्या
तर कोणी कोणाच्या फोडल्यात गाड्या
कोण म्हणतो मी हे केलं
दुसरा म्हणतो त्याच काय गेलं ?
पण…आता आमचं ठरलंय
ह्याने त्याच्यावर चिखल फेकला
कधी त्याने याच्यावर हात उगारला
कोणी कधी कोणाचा टाईम खराब केला
तर कधी कोणी कोणावर टीकेचा बाण सोडला
पण…आता आमचं ठरलंय
कोण चुकीच्या आरोपांत फसले
तर अनेकांचे चेहरे फक्त रॅलीत दिसले
कोण तेल लावून आलंय म्हणाला
तर कित्येकांचे मनसुबे नासले
पण…आता आमचं ठरलंय
आम्ही आहोत राजा
आणि आम्हीच प्रजा
आज फक्त आमचाच गाजावाजा
हो …आज आमचं ठरलंय