घरमुंबईशिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी बाबा रामदेव

शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी बाबा रामदेव

Subscribe

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांचे स्टार प्रचारक राज्यात दाखल झाले आहेत. काहींच्या सभा होत आहेत तर काहींच्या सभा होणार आहेत. विधान सभेची रणधुमाळी आता हळूहळू वेग घेत आहे. आरोप-प्रत्यारोपांपासून ते आश्वासनांपर्यंत अनेक प्रकारे मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न होत आहेत. स्टार प्रचारकांना बघण्यासाठी, ऐकण्यासाठी लोकांची गर्दी जमत आहे. त्याचा फायदा अर्थातच उमेदवाराच्या प्रचारासाठी होत आहे. कोण-कोण सभा घेतय याचा घेतलेला हा आढावा

1. राज्यात आज प्रचारसभांचा धडाकाच पहायला मिळणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या 4 सभा असून योगी आदित्यनाथ यांची मुंबई आणि परभणी येथे सभा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात प्रचारसभा होत आहेत.

- Advertisement -

2. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे देखील राज्यात प्रचार करताना दिसतील. प्रमोद सावंत आज पुण्यात एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

3. निवडणुकीच्या प्रचारामध्ये रामदेव बाबासुद्धा मागे राहिले नाहीत. रामदेव बाबा 15 ते 18 ऑक्टोबर दरम्यान लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये प्रचार करणार आहेत. शिवसेनेच्या सचिन देशमुख यांच्या प्रचारासाठी लातूरमध्ये खुद्द बाबारामदेव दाखल होणार आहेत.

- Advertisement -

4.पंतप्रधान मोदी हे राज्यात एकूण 9 सभा घेणार आहेत. तर, 18 तारखेला मोदी हे मुंबईत बीकेसीमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. मोदींच्या राज्यातील सभांचे अंतिम वेळापत्रक समोर आले आहे. 13 ते 17 ऑक्टोबरमध्ये मोदी राज्याच्या विविध जिल्ह्यात सभा घेणार आहेत.

5. मोदींपाठोपाठ आता राहुल गांधीदेखील महाराष्ट्रात प्रचार सभा घेणार आहेत. येत्या 13 तारखेला राहुल गांधी महाराष्ट्रात येणार असून 13 आणि 15 ऑक्टोबरला राहुल गांधींच्या महाराष्ट्रात 2 सभा होणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -