घरमुंबईवांद्रे पूर्वचा कायापालट करणार

वांद्रे पूर्वचा कायापालट करणार

Subscribe

मुंबईतील लक्ष्यवेधीे विधानसभेच्या निवडणुकांपैकी एक म्हणजे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघात शिवसेनेचे मुुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि आमदार तृप्ती प्रकाश सावंत यांच्या विरोधात काँग्रेसचे उच्चशिक्षित फक्त २७ वर्षांचे उमेदवार झिशान बाबा सिद्दीकी निवडणूक लढवत आहे. मुंबई प्रदेश युथ काँग्रेसचे जनरल सेक्रेटरीचे पद झिशान सिद्दीकी यांनी भुषवले आहे.

या मतदारसंघात अनेक समस्या आहेत. शिवसेनेचे मुंबईचे महापौर असलेल्या उमेदवारांनी वांद्रे परिसराकरिता कुठल्याही प्रकारची येथील रहिवाशांना सुविधा दिल्या नसल्याने अजूनही नागरिकांमध्ये नाराजी आहे. अशा ह्या परिसराचा कायापालट करण्याचे कार्य काँग्रेसने माझ्यावर विश्वास दाखवून सोपवले असल्याचे झिशान सिद्धीकी यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

या भागामध्ये दरवर्षी पावसामुळे लोकांच्या घरांमध्ये पाणी भरते आणि त्याच्यामुळे या भागामध्ये दुर्गंधी पसरुन आजार निर्माण होतात. याला आळा घालण्यासाठी रोगराईवर मात करण्याकरिता येथे एक प्रशस्त सुसज्ज रुग्णालय असणे आवश्यक आहे. त्याकरिता मी सदैव प्रयत्नशील राहिन,असे आश्वासन झिशान सिद्दीकी यांनी दिले आहे. तसेच येथील शाळांची सुद्धा दैनावस्था झालेल्या दिसून येत आहे.

विद्यार्थ्यांना बसण्याकरिता बेंचेससुद्धा नाहीत. त्यांना उच्च दर्जेदार शिक्षण सुद्धा मिळवून देण्यास मी बंधनकारक आहे. आमदार बाबा सिद्दीकी हे त्यांच्या समाजकार्यामुळे जनतेशी असलेल्या सलोख्याच्या संबंधामुळे कायम चर्चेत राहिलेले आहेत. याच अनुषंगाने आपल्या मुलाने देखिल सतत जनतेची समाजाची सेवा त्यांच्या हातून घडत राहावी, अशी वडिलांची इच्छा असल्याचे झिशान सिद्दीकी सांगतात.

- Advertisement -

युथ काँग्रेसचे सेक्रेटरीपदी असताना नेतृत्व केल्यामुळे मला जनतेसोबत काम करण्याची सवय असल्याने समस्या, त्यांच्या अडीअडचणी विषयी मला जाणीवपूर्वक माहिती आहे. ह्या सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्याकरिता कटीबद्ध असल्याचे सिद्धीकी सांगतात. या मतदारसंघात सर्व जातीधर्माचे लोक राहत असून कोणत्याही उमेदवाराच्या खोट्या आश्वासनाला बळी पडू नये,असे आवाहन सिद्दीकी करत आहेत.तसेच शासनाकडून मिळणार्‍या निधीमधून अनेक उपाय योजनेंतर्गत जनतेच्या सर्व समस्या सोडवून सुखसोयी उपलब्ध करून देईन,असेही आश्वासन झिशान सिद्दीकी यांनी दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -