घरमहाराष्ट्रराज्यात मोदी-शहांच्याही सभांचा धडाका; मुख्यमंत्र्यांच्याही दर दिवशी ६ सभा

राज्यात मोदी-शहांच्याही सभांचा धडाका; मुख्यमंत्र्यांच्याही दर दिवशी ६ सभा

Subscribe

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीची घोषणा झाल्यानंतर मंगळवारी शिवसेना-भाजपने आपआपल्या उमेदवारांची पहिली यादी देखील जाहीर केली. आता लवकरच हे दोन्ही पक्ष दुसरी यादी देखील जाहीर करतील. त्यानंतर उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर खऱ्या अर्थाने महायुतीच्या जाहीर सभांना देखील सुरुवात होणार आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देखील सभांच्या तोफा राज्यात धडाडणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात १० सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री अमित शहा हे २० सभा घेणार आहेत. महायुतीच्या उमेदवारासाठी नरेंद्र मोदी यांची शेवटची सभा ही मुंबईत होणार असल्याचेही माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

केंद्रातल्या इतर नेत्यांच्याही होणार सभा

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच नाही तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, पियुष गोयल यांच्या देखील सभा होणार आहेत. सध्या भाजप कार्यालयात या सभांचे वेळापत्रक तयार होत असून येत्या काही दिवसांत या सभांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री दिवसाला घेणार ६ सभा आणि रोड शो

विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देखील सभाचा धडाका असणार असून, मुख्यमंत्री ९० पेक्षा अधिक सभा घेण्याची शक्यता आहे. या सभांमध्ये देखील अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. यामध्ये रोड शोचा देखील समावेश असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -