घरमुंबईभाजपकडून आज सत्ता स्थापनेचा दावा नाही

भाजपकडून आज सत्ता स्थापनेचा दावा नाही

Subscribe

भाजपकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला गेला नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळांने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन येथे जाऊन भेट घेतली. या शिष्टमंडळात भाजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, आशिष शेलार आणि सुधीर मुनगंटीवार या बड्या नेत्यांचा समावेश होता. राज्यपालांसोबत बैठक झाल्यानंतर भाजपच्या या शिष्टमंडळाने पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेत भाजपकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला गेला नसल्याचे सांगण्यात आले. राज्यात सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर आमची राज्यपालांशी चर्चा झाली. त्यानंतर आता पुढे काय करायचे ते आम्ही ठरवू, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

राज्यपालांशी चर्चा झाली; आता पुढे काय ते ठरवू – चंद्रकांत पाटील

‘सरकार स्थापन व्हायला वेळ लागत असल्यामुळे आम्ही राज्यपालांकडे गेलो होतो. महाराष्ट्रात नेमके काय चालू आहे? यावर खुप सविस्तर चर्चा झाली. या चर्चेनंतर पुढे काय करायचे ते आम्ही ठरवू’, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. त्याचबरोबर ‘सरकार स्थापन व्हायला वेळ लागत असल्यामुळे आम्ही राज्यपालांकडे गेलो होतो. महाराष्ट्रात नेमके काय चालू आहे? यावर खुप सविस्तर चर्चा झाली. या चर्चेनंतर पुढे काय करायचे ते आम्ही ठरवू’, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -