घरमहाराष्ट्रभाजपमध्ये फूट पडणार? एकनाथ खडसेंच्या घरी तावडेंसोबत बैठक!

भाजपमध्ये फूट पडणार? एकनाथ खडसेंच्या घरी तावडेंसोबत बैठक!

Subscribe

पंकजा मुंडे याच्या फेसबुक पोस्टवरून गोंधळ सुरू असतानाच आता एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांच्यात झालेल्या बैठकीमुळे नवी चर्चा सुरू झाली आहे.

विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात भाजपच्या कमी झालेल्या जागा आणि त्यानंतर सत्तेतून पायउतार व्हायची आलेली वेळ या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अंतर्गत अस्वस्थता असल्याचं पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांना पायउतार व्हावं लागल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार येणार हे निश्चित झाल्यानंतर एकनाथ खडसेंनी नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली होती. त्यानंतर खुद्द पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टवरून अनेक तर्क-वितर्क काढले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी विनोद तावडेंसोबत त्यांची बैठक झाली. या बैठकीत नक्की काय चर्चा झाली? याविषयी स्वत: खडसेंनी वेगळं कारण दिलं असलं, तरी त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्टपणे दिसत होती. ‘भाजपसमोर काहीही आव्हानं नसून सध्यातरी पक्ष एकसंध आहे’, असं खडसे म्हणाले. एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

‘भाजप सध्यातरी एकसंध’

दरम्यान, यावेळी प्रतिक्रिया देताना खडसे म्हणाले, ‘आमच्याकडे असणाऱ्या एका कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी तावडेंसोबत बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये इतर कोणत्याही मुद्द्यावर चर्चा झालेली नाही. भाजप सध्यातरी एकसंध आहे. निवडणुका आल्या, की तुम्हाला जे असेल ते दिसून येईल’. दरम्यान, पंकजा मुंडेंसोबतच्या भेटीविषयी देखील खडसेंनी प्रतिक्रिया दिली. ‘मी दरवर्षी गोपीनाथ गडावर जातो. याही वर्षी मी जाणार आहे. ज्या काही चर्चा आहेत, त्या मीडियामधूनच मला समजत आहेत’, असं ते म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप आता हिवाळी अधिवेशनानंतरच!

तावडेंची चुप्पीच!

दरम्यान, एरवी प्रतिक्रिया देण्यात कोणतीही माघार न घेणाऱ्या विनोद तावडेंनी आज मात्र खडसेंसोबतच्या बैठकीविषयी विचारलं असता कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं. ‘जे नाथाभाऊंनी सांगितलं, तेच’, एवढीच प्रतिक्रिया देऊन विनोद तावडेंनी तिथून काढता पाय घेतला. दरम्यान, या भेटीनंतर एकनाथ खडसे यांनी थेट पंकजा मुंडेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये नक्की काय चर्चा झाली? याविषयी अद्याप काहीही कळू शकलेलं नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -