घरमुंबईयेत्या पाच वर्षात एक कोटी लोकांना रोजगार देणार; भाजपचा संकल्प

येत्या पाच वर्षात एक कोटी लोकांना रोजगार देणार; भाजपचा संकल्प

Subscribe

शिवसेनेने आपला वचननामा जाहीर केल्यानंतर आज, मंगळवारी वांद्र्यातील रंगशारदा येथे भारतीय जनता पक्ष सकाळी साडे नऊ वाजता आपला निवडणुकीचा जाहीरनामा म्हणजे “संकल्प पत्र” प्रकाशित करत आहे. या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, मंत्री विनोद तावडे आदी मान्यवर उपस्थि आहेत. जाहीरनाम्याच्या प्रकाशनम सोहळ्याची सुरुवात भाजपच्या कॅम्पेन गीताने करण्यात आली असून गाण्याला अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केले आहेत. तर गीतकार गुरू ठाकूर यांनी लिहीले आहे. हे दोघे यावेळी सभागृहात उपस्थित होते. दरम्यान, प्रकाशनापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराव वडकते यांचा भाजप प्रवेश कार्यक्रम पार पडला. त्यानंतर संकल्प पत्र जाहीर करण्यात आले.

यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, प्रचारामध्ये आम्ही चांगली मजल मारली आहे. विरोधकांकडे आता विरोध करण्यासाठी नेताही उरला नाही. मागील पाच वर्षात कुठलाही संघर्ष न होता अनेक विषय मार्गी लागले. पाच वर्षात कुठेही दंगा नाही किंवा गोळीबार झाला नाही. उत्तम प्रशासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले. दुष्काळमुक्त महाराष्ट्र्र हा आमचा मोठा संकल्प आहे. शेतकऱ्यांना समृद्ध करणे हा आमचा संकल्प आहे. इंदू मिलचे स्मारक, शिव स्मारक या सर्व गोष्टी आम्ही पुढच्या पाच वर्षात करू. सुख, आनंद आणि सुरक्षितता हे आमच्या संकल्पात असणार आहे.

- Advertisement -

भाजपच्या संकल्प पत्रात एकूण सोळा घोषणा

– मराठवाडा ग्रीडच्या माध्यमातून प्रत्येक घरात पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी देणार

– शेतीला संपूर्ण वीज डिस्त्रीबुट्य करणासाठी सोलारच्यामार्फत १२ तास पुरवणार

- Advertisement -

– १ कोटी लोकांना रोजगार देणार

– एक कोटी महिलांना बचत गटाशी जोडून रोजगाराच्या विशेष संधी उपलब्ध करणार

– प्रत्येक बेघराला २०२२ पर्यंत घर आणि प्रत्येकाला पिण्याचं पाणी देणार

– पायाभूत सुविधांमध्ये केंद्राच्या मदतीने ५ लाख कोटींची गुंतवणूक करणार

– राज्यातील सर्व प्रकारच्या रस्त्यांची कायमस्वरूपी देखभाल करणयासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार

– मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून सर्व वस्त्या बारमाही रस्त्यांनी जोडणार त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा दुसरा टप्पा ३० हजार किमी लांबीचा ग्रामीण रस्ता बनवणार आणि शेतकऱ्यांच्या शेतात जाणार रस्ता “पाणंद रस्ते,” म्हणून मजबूत करणार

– भारत नेट आणि महानेटच्या माध्यमातून महाराष्ट्रभरात इंटरनेट जोडणार

– आरोग्य सर्वांसाठी, सर्वांच्या आवाक्यातील, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा फुले जनारोग्य योजना यांची व्याप्ती वाढून पैशाअभावी कोणीही वैद्यकीय उपचारांपासून वंचित राहणार नाही हे सुनिश्चित करणार

– शिक्षण हे काल सुसंगत अधिक मूल्यधीष्टित करणार, राष्ट्रीय व संवैधनीक मूल्याचे शिक्षण देणार

– सर्व प्रकारच्या कामगारांना नोंदीत करून सामाजिक सुरक्षेच्या परिघात आणणार

– राज्यातील सर्व शहीद जवान, माजी सैनिक, कर्तव्यपालन करताना मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांचे कुटुंबीय यांच्या पुनर्वसनासाठी विशेष कार्यक्रम राबवणार

– राज्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसनासाठी धडक मोहीम राबवून पुनर्वसनाचा काम लवकर पूर्ण करणार

– महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व स्वातंत्रवीर सावरकर यांचा “भारतरत्न” पुरस्काराने गौरव व्हावा यासाठी प्रयत्न करणार

#Live: भाजपच्या 'संकल्प पत्र' प्रकाशन सोहळ्याला सुरूवात

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಅಕ್ಟೋಬರ್ 14, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -