घरमहाराष्ट्रचंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मधील उमेदवारीला ब्राह्मण महासंघाचा विरोध

चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मधील उमेदवारीला ब्राह्मण महासंघाचा विरोध

Subscribe

‘ज्यांनी कधी निवडणूक लढवली नाही, त्यांनी आम्हाला शिकवू नये’, असा टोमणा विरोधक महसूलमंत्री चंद्राकांत पाटील यांना नेहमी लगावत असतात. यामुळे यंदा विधानसभेत जाण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी मतदारसंघाची चाचपणी सुरु केली होती. पुण्यातील कोथरुड मतदारसंघात विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापून तेथून चंद्राकांत पाटील यांना उमेदवारी देण्याचा घाट घातला जात होता. मात्र कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातून ब्राह्मणांना हद्दपार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना आता पुण्यातील ब्राह्मण महासंघाने चंद्राकांत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.

“कोथरुडमध्ये १ लाख ब्राह्मण मतदार असताना बाहेरून उमेदवार आणण्याचा गरज काय? संभाजी महाराज उद्यानातून राम गडकरी यांचा पुतळा काढण्यात आला होता. त्यावेळी ब्राह्मण महासंघाने रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. मात्र चंद्राकांत पाटील यांनी पालकमंत्री असूनही कोणतीही ठोस भूमिका घेतली नव्हती.” त्यामुळे आमचा चंद्राकांत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचे ब्राह्मण महासंघाचे अनिल दवे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -